Diary of Fake Developer

July 17, 2009

डायरी ऑफ़ व्हर्चुअल डेव्हलपर

Filed under: Uncategorized — Fake Developer @ 12:39 pm

प्रस्तावना

प्रथमच सांगितलेले बरे…..मला ही कल्पना fake IPL player च्या ब्लॉगवरुन सुचली….

ईतके प्रसंग या छोट्याशा जागी होत असतात आणी ते कोणाबरोबरतरी वाटावे शेअर करावे असे वाटणे स्वभाविकच आहे…

म्हणुन हा खाटाटोप…जसे सगळ्या डेव्हलपमेंट सेंटरमध्ये असतात तशी सर्व पात्रे येथेपण आहेत..वाद व मारामारी टाळण्यासाठी नावे बदलली आहेत (जीव प्रत्येकाला प्यारा असतो मग तो कधी आपला असतो किंवा कधीकधी दुसरयाचा व्हर्चुअली आपल्याकडे ठेवलेला…कधी आपल्या नकळत तर कधी ज्याचा आहे त्याच्या नकळत…प्यारा असतो हे मात्र नक्की)…

तर असे हे आमचे डेव्हलपमेंट सेंटर….अश्या ठिकाणी आहे की लोक आठवडाभर काम करुन थकल्यावर आलेला शीण घालवयला जेथे येतात आणि आम्ही बापुडे थकुनमाकुन घरी निघालेले असतो…..तुम्ही म्हणाल काय मस्त जागा असेल पण मित्रहो ही जागा आठवडाभर उजाड असते…आणि ती फुलते तेव्हा आम्ही मात्र घरचे वेध लागुन घरच्यावाटेवर पांथस्त झालेले असतो…याला म्हणतात नशीब….

Create a free website or blog at WordPress.com.